दोडामार्ग: चंदगड बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तिलारी घाटातील वाहतुकीला अडथळा

शेअर करा

स्त्यावर वाकलेल्या झाडांचा एसटी बसला अडथळा; तातडीने झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी

दोडामार्ग,दि.१० ऑगस्ट

सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक समस्यांना नागरिक प्रवासी याना तोंड द्यावे लागत आहे. चंदगड बांधकाम विभाग यांच्या ताब्यात असलेल्या
तिलारी घाटात रस्ता दुतर्फा, तसेच इतर झाडे वाकून खाली आली आहेत ही झाडे चक्क एस टी बसला लागतात यामुळे वाहकाला खाली उतरून झाडी बाजूला करत एस टी बस पुढे न्यावी लागते तेव्हा झोपी गेलेल्या चंदगड बांधकाम विभाग यांनी तिलारी घाटातील झाडे तातडीने तोडून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी
प्रवासी वर्गातून होत आहे.
गोवा दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर, हा मुख्य मार्गावर सात किलोमीटर तिलारी घाट लागतो हा घाट धोकादायक आहे. धोकादायक चढ उतार वळणे आहेत. पाऊस सुरू झाल्यावर या घाटात रस्ता दुतर्फा मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. मोठी झाडे वाकून खाली आली आहेत ती एस टी बसला घासत आहेत समोर येणारे वाहन येत नाही.
तिलारी घाटातील रस्ता देखभाल दुरुस्ती करणे सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांची जबाबदारी होती. पण चंदगड बांधकाम विभाग यांच्या ढिसाळ कारभारामुळे तिलारी घाटाकडे दूर्लक्ष झाले आहे. राञीच्या वेळी झाडी धुके यामुळे समोरच दिसत नाही. अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
सोमवारी कोल्हापूर, दोडामार्ग, पणजी बस तिलारी घाट उतरत असताना घाटातील झाडे एस टी बसच्या टपाला लागू लागली. त्यामुळे बस मधून वाहकाला खाली उतरून झाडे फांद्या हाताने बाजूला करून एस टी बसला वाट करून दिली. तेव्हा चंदगड बांधकाम विभाग यांनी तातडीने तिलारी घाटातील झाडे फांद्या झाडी तोडून तिलारी घाट रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली जात आहे.

तिलारी घाटात वाढलेल्या झाडीकडे चंदगड बांधकाम विभाग यांचे दूर्लक्ष वाहकाला खाली उतरून झाडे बाजूला करण्याची वेळ

दोडामार्ग, दि. १० आॅगस्ट प्रतिनिधी