दोडामार्ग : गिरोडा येथे जमीन मोजणी सर्व्हेक्षण ग्रामस्थ यांनी रोखली पोलीस बंदोबस्त मध्ये सुरू होती मोजणी

शेअर करा

दोडामार्ग, दि. ११ जून

गिरोडा गावात मंदिराला लागून शेकडो एकर जमीन ही सामाहिक आहे. शिवाय काही वर्षापूर्वी भूमी अभिलेख कडून झालेल्या मोजणी नुसार प्रत्येक जणांच हहिस्सा वहिवाट ठरली होती यामुळे काही ग्रामस्थ यांनी आपल्या वहिवाट मध्ये काजू लागवड केली होती. या ठिकाणी गावातील एका व्यक्तीने जमीन खरेदी केली. पण खरेदी केली यापेक्षा जास्त जमीन जाते या ठिकाणी जमीन खरेदी केलेल्या इसमाने गुरुवारी मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कर्मचारी यांना बोलावले होते.
काही लोकांना कळविले होते, सात बारा मध्ये ८१ गुंठे तर नकाशात ११२ गुंठे याबाबत अगोदर तक्रार देखील केली होती. तरी मोजणी लावली
यावेळी पोलीस बंदोबस्त मागवला होता या ठिकाणी ग्रामस्थ जमा झाले होते. यावेळी ग्रामस्थ यांनी मोजणीसाठी अर्ज केलेल्या इसमाला आपल्या हद्दीत जाण्यास विरोध केला. यावेळी हमरातुमरी झाली. अखेर ग्रामस्थ यांनी ही मोजणी मान्य नाही असे लिहुन दिले यामुळे मोजणी रद्द करण्यात
चौकशी झाल्याशिवाय मोजणी करु नये असे लेखी लिहुन दिले.

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात जमीन बाबत तक्रारी वाढत आहेत. नकळत जमीन बळकावणे
याबाबत तक्रारी वाढत असताना गिरोडा गावातील ग्रामस्थ यांनी येथे मोजणीला विरोध केला आहे.

गिरोडा गावातील सर्व्हे क्र ८१ हिस्सा नं ७ मध्ये गुरुवारी दोडामार्ग भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी यांनी अर्जदार यांनी मागणी केल्या प्रमाणे मोजणी आयोजित केली होती. काही गडबड होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मागवला होता. सकाळी मोजणी सुरू झाली तेव्हा ग्रामस्थ गोळा झाले अर्जदार व लगतदार दरम्यान किरकोळ वादावादी सुरू होती. अर्जदार यांनी यांने जमीन खरेदी केली तेव्हा हद्द माहिती नाही. त्याने आमच्या वहिवाट मध्ये जाऊ नये ही मोजणी मान्य नाही. शिवाय या अगोदर लेखी तक्रार दिली मग मोजणी कशी लावली असा सवाल ग्रामस्थ यांनी केला.

शेअर करा