उसप गाव याला पूर्णपणे विरोध करणार वेळ पडल्यास न्यायालयात जावू माजी सरपंच प्रकाश गवस यांचा इशारा
दगड उत्खनन मुळे लाखो फळझाडे येणार धोक्यात
दोडामार्ग, दि.११ जुलै
उसप गावातील ग्रामस्थ याना अंधारात ठेवून पणजी गोवा येथील एका परप्रांतीय उद्योजक याने उसप गावातील गावरान जमीन असलेल्या सर्व्हे नंबर ३६० मध्ये काळा दगड उत्खनन तसेच कुञिम वाळू डस तयार करण्यासाठी मोठा स्टोन क्रशिगंसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज केला आहे. या उसप गावातील ग्रामस्थ याना कल्पना नाही पण दोडामार्ग तालुक्यातील काही महसूल खात्यातील कर्मचारी पंचयादी तयार करून समक्ष म्हणून नाव सही घेऊन आपला विरोध नाही अशी बनावट कागदपत्रे तयार करण्यात गुतंली आहेत यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान उसप गावातील ग्रामस्थ माजी सरपंच प्रकाश गवस यांनी उसप गावाला उध्वस्त करणाऱ्या अशा प्रकल्पाला गावात थारा दिला जाणार नाही. दगड खाण क्रशर मुळे लाखो फळझाडे उध्वस्त होऊन उसप गाव प्रदूषित होणार आहे यामुळे उसप गावात असे प्रकल्प होवू देणार नाही. वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ असे प्रकाश गवस यांनी सांगितले. उसप गावातील ग्रामस्थ यांनी प्रकाश गवस याना पाठिंबा दिला आहे.
महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने सासोली येथील शेकडो एकर सामाजिक जमीन खोटया सनद तयार करून परप्रांतीय धनाढय मंडळी यांच्या घशात घातली हे प्रकरण गाजत असतानाच गावरान जमीन म्हणून ओळख असलेल्या उसप गावातील शेकडो एकर जमीन हडप करून या ठिकाणी काळा दगड उत्खनन तसेच कुञिम वाळू निर्माण करण्यासाठी स्टोन क्रशिगंसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आणि महसूल खात्याचे कर्मचारी यात गुंतले आहेत. महसूल कर्मचारी पंचयादी तयार करून यात काही मुद्दे उपस्थित करून विरोध नाही समक्ष म्हणून नावे सही घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे उसप गावात जोरदार चर्चा विरोध सुरू झाला आहे.