पाणलोट समित्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा सरपंच, सचिव व लोकप्रतिनिधींचा आरोप; वस्तुस्थिती पालकमंत्री व आमदारांसमोर मांडणार असल्याची घोषणा.
दोडामार्ग, दि. १० जुलै
दोडामार्ग तालुक्यात पाणलोट क्षेत्र अंतर्गत पाणलोट कामात अनियमितता अशी तक्रार ज्यांनी केली त्याना शुक्रवारी आयोजित बैठकीत उपस्थित राहावे असे कळविले होते. पण ते अनुपस्थितीत राहिले. बाबत सरपंच सचिव लोकप्रतिनिधी यांनी संताप व्यक्त करत दोडामार्ग तालुक्यातील कामा बाबत वस्तूस्थिती पालकमंत्री, आम, यांची भेट घेऊन देणार अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दोडामार्ग तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात झालेली कामे झालेल्या तक्रारी याबाबत सरपंच सचिव
यांची बैठक जलसंधारण विभाग अधिकारी व कर्मचारी सरपंच सचिव दरम्यान पार पडली या नंतर झालेल्या पञकार परिषदेत सरपंच सचिव लोकप्रतिनिधी यांनी सांगितले संपूर्ण तालुक्यातील पाणलोट समित्याना बदनाम करणे गैर आहे,
दोडामार्ग तालुक्यातील बहुतांश गावात पंचवार्षिक पाणलोट प्रकल्प सुरु असून तो अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्प बाबत तालूक्याबाहेरील काहींनी तक्रारी दिल्या आहेत. शिवाय माध्यमातून तालुक्यातील पाणलोट प्रकल्प विषयी बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सरपंच हे गावातील पाणलोट समितीचे अध्यक्ष आहेत. ज्या तक्रारी केल्या जात आहेत त्या संबंधित कार्यान्वयीन यंत्रणे बाबत असल्याने सर्वं समित्याना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच व कार्यान्वयीन यंत्रणेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली. या बैठकीचे निमंत्रण संबंधित तक्रारदार यांनाही देण्यात आले. मात्र यावेळी तक्रारदार उपस्थित राहिले नसल्याने सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली.
लवकरच पालकमंत्री, खासदार, आमदार, यांची भेट घेतली जाईल असे सांगितले.