दोडामार्ग-आयी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रशासनाचा वचक कुठे?

शेअर करा

गणेशोत्सव तोंडावर असतानाही खड्डे न बुजवल्याने नागरिक त्रस्त; लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातच ‘रस्ता चांगला आहे, सावकाश जावा’चा फलक

दोडामार्ग, दि. ७ सप्टेंबर

गणेश चतुर्थी सण जवळ आला आहे. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, रस्ते निर्माण विभाग याना सूचना देऊन देखील प्रशासनाचा वचक नाही यामुळे अधिकारी ठेकेदार काम करत नाही. दोडामार्ग ते आयी रस्त्यावर बाजारपेठ मध्ये काही ठिकाणी खड्डे पडले आहेत यात पाणी साचून ते पाणी वाहन गेल्यावर दुकानात घरात उडते किंवा दुचाकी पादचारी यांच्या अंगावर उडते बांधकाम विभाग याना कल्पना देऊन देखील खड्डे बुजवले नाही यामुळे स्थानिकांनी लक्ष वेधण्यासाठी चक्क खड्ड्यात रस्ता चांगला आहे सावकाश जावा असा फलक लावला.

सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ताब्यात हा रस्ता येतो दोडामार्ग आयी रस्त्यावर दोडामार्ग बाजारपेठ मध्ये खड्डे पडले आहेत. वेळीच दुरुस्ती केली जात नाही. या ठिकाणी पावसाळी डांबर खडी टाकून खड्डे बुजवा अशी मागणी करुन देखील लक्ष नाही यामुळे स्थानिकांनी खड्यात फलक लावून लक्ष वेधले.

शेअर करा