बांदा येथे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे पडताळणी कँप

शेअर करा

बांदा,दि.१० जुलै

निरीक्षक वैधमापनशास्त्र सावंतवाडी विभागाच्या वतीने रविवार दि. 12.7.26 ते बुधवार 15.7.26 या कालावधीत बांदा शहर व पंचक्रोशीसाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे मुद्रांक पडताळणी कँपचे श्री विठ्ठल मंदिर शेजारी व्यापारी भुवन, बांदा येथे आयोजन करण्यात आले आहे.तरी व्यापारी वर्गाने आपले इलेक्ट्रॉनिक वजनकाटे पडताळणीसाठी आणावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा