सावंतवाडीत २८ मे रोजी ‘नॅब’ला नेत्र तपासणी वाहन प्रदान समारंभ; दृष्टीबाधितांना साड्या व टी-शर्टचे वाटप

शेअर करा

सावंतवाडी, दि. २० मे
नॅशनल असोसिएशन फॉर डी ब्लाइंड (नॅब) सिंधुदुर्ग, भटवाडी-सावंतवाडी यांच्या नॅब नेत्र रुग्णालयाला अत्याधुनिक नेत्र तपासणी वाहन प्रदान करण्याचा समारंभ गुरुवार, दिनांक २८ मे रोजी सकाळी ११ वाजता नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
​हे नेत्र तपासणी वाहन नॅब रुग्णालयाला अमेरिका येथील डॉ. देवदत्त मिशाळ व डॉ. सुरेखा मिशाळ यांच्या उदार देणगीतून प्राप्त झाले आहे. ही महत्त्वपूर्ण देणगी मिळवून देण्यासाठी कोल्हापूर येथील उद्योजक श्री. प्रकाश मिशाळ यांनी विशेष प्रयत्न केले असून या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित राहणार आहेत.
​या कार्यक्रमाचे औचित्य साधून देणगीदारांच्या वतीने नॅब सिंधुदुर्गच्या लाभार्थी दृष्टीबाधितांना साड्या व टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. तरी नॅब सिंधुदुर्गच्या सर्व लाभार्थींनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे. तसेच सावंतवाडीतील नागरिकांनी व संस्थाचालकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नॅबचे अध्यक्ष श्री. अनंत उचगावकर, सचिव श्री. सोमनाथ जिगजींनी व खजिनदार श्रीमती विनया बाड यांनी केले आहे.

शेअर करा