सिंधुदुर्ग : कोल्हापूर जोडणा-या घोटगे – सोनवडे घाट मार्गाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारची अंतिम परवानगी -आ. निलेश राणे

शेअर करा

ब-याच वर्षापासून रखडलेला प्रश्न लागला मार्गी ; सिंधुदुर्गाच्या विकासाला मिळणार चालना

सिंधुदुर्ग,दि.२५ ऑगस्ट

कोल्हापूरला जोडणा-या घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण घाटमार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंजुरीमुळे असून, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून करण्यात येत असलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची माहिती आ.निलेश राणे यांनी दिली. याबद्दल या प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणारे खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे,आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे त्यांनी कौतुक केले.
या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक अंतिम परवानगी मिळाल्याने प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पर्यावरणीय मंजुरी अगोदरच मिळालेली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक असलेली अंतिम परवानगीही मिळाली आहे. घोडगे-सोनवडे घाटमार्गामुळे सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणारी वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. या मार्गामुळे परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता स्थानिक तसेच राज्य पातळीवर आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलली जातील. सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील,असा विश्वास आ. निलेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकल्पासाठी ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केले, प्रयत्न केले त्या सर्वांचे तसेच संबंधित अधिकारी यांचे आभार असल्याचे आ. राणे यांनी सांगितले.

शेअर करा