रोटरी क्लब डोंबिवली सनसिटीच्या सहकार्याने ९० विद्यार्थ्यांना अॅप उपलब्ध; दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त मार्गदर्शन
सावंतवाडी,दि.०७ ऑगस्ट
दहावीच्या विध्यार्थ्यांना त्यांच्या SSC परीक्षेत यशस्वी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील सौ आणि रो.अमोल कामत यानी रोटरी क्लब, डोंबिवली सनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले App आज कळसुलकर इंग्लिश स्कूल येथील 90 विध्यार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात आला.
या कार्यक्रमात रोटरी क्लब डोंबिवली सनसिटी, रोटरी क्लब कणकवली सेंट्रल आणि रोटरी क्लब, सावंतवाडीनी सहभाग घेतला होता.
यावेळी रो.अमोल कामत यांनी मुलांना हे App कसे वापरून 90% पेक्षा जास्त गुण कसे प्राप्त करता येतील याविषयी मार्गदर्शन केले. तर रोटरी क्लब डोंबिवली सनसिटीचे अध्यक्ष रो. डॉ.कैलास दातरांगे 10 ची परीक्षा कशी आयुष्यातील यशस्वी पायरी आहे आणि ती या App च्या माध्यमातून यशस्वी गाठता येईल या विषयी खुमासदारपणे विध्यार्थ्यां समोर मांडले. रोटरी क्लब, सावंतवाडीचे सचिव रो. सुहास सातोस्कर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य श्री. भुरे सर यांनी आभार व्यक्त करताना हे App विध्यार्थ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवेल अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन सारंग सर यांनी केले.
यावेळी रोटरी क्लब, सनसिटी डोंबिवली सचिव निखिल आपटे आणि खजिनदार रो.अलंकार तायशेटे, रोटरी क्लब, कणकवली सेंट्रलचे रो. नितीन बांदेकर आणि रो. वर्षा बांदेकर तर रोटरी क्लब, सावंतवाडीचे रो. प्रमोद भागवत, रो. दिलीप म्हापसेकर, रो. ऍड.सिद्धार्थ भांबुरे, रो. विनय काणेकर, रो. सुबोध शेलटकर, रो. प्रदीप शेवडे या कार्यक्रमाला उपस्थिती होते.