जामसंडे येथील ह.भ.प. वासुदेव बुवा कुळकर्णी यांचे निधन

शेअर करा

अल्पशा आजाराने राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; सोमवारी सायंकाळी अंत्यविधी

देवगड,दि.२८ सप्टेंबर

जामसंडे येथील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. कीर्तनभूषण वासुदेव बुवा कुळकर्णी यांचे सोमवारी सकाळी ७ वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जामसंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधन करणारे वासुदेव बुवा कुळकर्णी यांची परिसरात वेगळी ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी यांचे ते वडील होत.

त्यांचा अंत्यविधी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जामसंडे येथील स्मशानभूमीत होणार आहे.

शेअर करा