कणकवली: हळवळ येथे ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

शेअर करा

श्रीराम सेवा मंडळ मुंबईतर्फे गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप; JEE Main यशाबद्दल जय मुकुंद राणेचा विशेष सन्मान

कणकवली ,दि.०९ ऑगस्ट

श्रीराम सेवा मंडळ मुंबई (हळवळ) यांच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच इंजिनीअरिंग, गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसह कला, क्रीडा, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या हळवळ गावातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ आज श्रीराम मंदिर, हळवळ येथे उत्साहात पार पडला.

या समारंभात ४५ गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, JEE Main प्रवेश परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कुमार जय मुकुंद राणे यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम सेवा मंडळ मुंबईचे संस्थापक-सचिव चंद्रकांत राणे होते. यावेळी कणकवली पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, हळवळच्या सरपंच चव्हाण मॅडम, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अनिल राणे, ज्येष्ठ सदस्य ज्ञानदेव राणे, विठोबा राणे, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण राणे, ज्येष्ठ सदस्य भास्कर राणे, तातू राणे, शशी राणे, शामसुंदर राणे, रमेश राणे, प्रभाकर राणे, नामदेव राणे, डॉ. दिलीप घाडी, ॲड. शंकर राणे, रघुनाथ कुबल, मारुती सावंत, एकनाथ राणे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकूर, समर्थ राणे, संदीप राणे, प्रदीप राणे, ग्रामपंचायत सदस्य सौ. परब मॅडम आदींसह श्रीराम सेवा मंडळ मुंबई व स्थानिक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ज्ञानदेव राणे, लक्ष्मण गावडे, तांबे सर व अनिल राणे यांनी मनोगत व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश राणे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शामसुंदर राणे यांनी केले, तर आभार ॲड. शंकर राणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम राणे, मयूर राणे, मंदार राणे, गजानन राणे, प्रशांत राणे, बापू पाटकर, अनिकेत राणे व विघ्नेश राणे यांनी विशेष मेहनत घेतली.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांच्या भावी वाटचालीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

शेअर करा