फळ, फुले , भाजी विक्रेत्यांसाठी तात्पूर्ती जागा निश्चित ; मुख्याधिकारी गौरी पाटील ऑन फिल्ड
कणकवली,दि.१० जुलै
कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली कणकवली नगरपंचायतच्यावतीने सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली पटवर्धन चौक येथील उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने तेथील फळे , भाजी , फुले विक्रेत्यांना तात्पूर्ती सार्वजनिक रिक्षाचालक मालक गणेशोत्सवाच्या जागेच्या बाजुला मार्किंग करुन जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील पुन्हा ऑन फिल्ड उतरुन हटाव मोहिमेला शुक्रवारी सकाळपासून सुरुवात केली आहे.
कणकवली नगरपंचायतच्यावतीने शुक्रवारी पुन्हा एकदा उड्डाणुलाखालील स्टॉल हटाव मोहिम हाती घेतली.

कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे भाजी, फळ, फुल विक्रेते तसेच अन्य स्टॉल धारक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना शहरातील पेट्रोल पंपासमोर उड्डाणपुलाखाली भाजी फळ, फुल विक्रेत्यांसाठी 10 बाय 10 फुट जागेची निश्चिती करण्यात आली आहे. एक कुटुंबातील एकालाच जागा मिळणार आहे. तसेच संपूर्ण उड्डाणपुलाखाली लावण्यात आलेली वाहने हटवण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस , आरटीओ व नगरपंचायत अशी एकत्रित हटाव मोहिम हाती घेणार असल्याचा इशारा, मुख्याधिकारी गौरी पाटील दिला आहे. या पार्श्वभूमीवर पटवर्धन चौक ते नाका या उड्डाणपुलाखालील वाहनांची पाहणी मुख्याधिकाऱ्यांनी केली. यावेळी पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.