सरपंच संदीप मेस्त्री , जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
कणकवली,दि.१० ऑगस्ट
कलमठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र उर्फ पप्पू यादव यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून पप्पू यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
कलमठ ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद राजीनाम्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते. या रिक्त पदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी पप्पू यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यांच्या निवडीनंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले. पप्पू यादव यांचे उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, शक्ती केंद्रप्रमुख स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, महेश लाड, दिनेश गोठणकर, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, प्रियाली आचरेकर, तनिष्का लोकरे, स्वाती नारकर, इफात शेख, नजराणा शेख, हेलन कांबळे, श्रेयस चिंदरकर, सचिन खोचरे, प्रीती मेस्त्री, मिलिंद चिंदरकर, आबा कोरगावकर, परेश कांबळी, संतोष रेवंडकर, गणेश पुजारे, ऋत्विज राणे, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, प्रणय शिर्के, समीर राजपूत, महेश मेस्त्री, कैलास साटेलकर, सागर पवार, परेश आचरेकर, नागेश लाड, प्रतीक माईणकर आदी उपस्थित होते.
रवींद्र उर्फ पप्पू यादव हे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. निवडीनंतर बोलताना त्यांनी कलमठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि उपसभापती सोनू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी काम करणार आहे. गावाच्या विकास प्रक्रियेत सर्वांना सोबत घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्यावर आपला विशेष भर राहील, अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच पप्पू यादव यांनी दिली.