दोन जेसीबीच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालयासमोरील स्टॉल हटवले ;गेली अनेक वर्षे स्टॉलने व्यापलेल्या जागेने घेतला मोकळा श्वास..
कणकवली,दि.१० जुलै*
कणकवली शहरातील नरडवे रोडवरील नगरपंचायतच्या आरक्षित असलेल्या व आता ताब्यात आलेल्या जागेमध्ये असलेल्या स्टॉल हटाव मोहिमेला शुक्रवारी सायंकाळी अचानक मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात करण्यात आली. या अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे स्टॉलधारकांची एकच धावपळ उडाली. यापूर्वी येथील स्टॉल धारकांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर मध्यंतरी बराच कालावधी गेला. परंतु शुक्रवारी सायंकाळी अचानक कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली. दोन जेसीबीच्या साह्याने उपजिल्हा रुग्णालयासमोरील भाग तसेच नरडवे नाका पर्यंतच्या भागातील स्टॉल हटवण्यात आल्याने अनेक स्टॉलधारकांनी गेले अनेक वर्ष थाटलेली दुकाने रस्त्यावर आली आहेत. नगरपंचायतच्या या कारवाईमुळे या स्टॉलनी व्यापलेल्या जागेने मोकळा श्वास देखील घेतला आहे. नगरपंचायतचे कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
कणकवली शहरातील नरडवे रोडवरील नगरपंचायतीच्या आरक्षित व नुकत्याच ताब्यात आलेल्या जागेतील स्टॉल हटाव मोहिमेला शुक्रवारी सायंकाळी अचानक सुरुवात करण्यात आली. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे स्टॉलधारकांची मोठी धावपळ उडाली.