कणकवली,दि.०९ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराची मासिक सभा तसेच सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार महिला मंडळाची मासिक भिशी व स्वाध्याय कार्यक्रम शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी जैन मंदिर, बोर्डवे-कणकवली येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमादरम्यान जैन परिवारातील विविध परीक्षा, स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये कु. अद्विता महावीर पोकळे हिने दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळविल्याबद्दल, कु. श्रेया साहील डोर्ले हिने भारती विद्यापीठ, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेली इंग्रजी परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केल्याबद्दल, कु. वाणी दीपराज बिजीतकर हिने STS व BDS परीक्षांमध्ये गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल तसेच कु. सौम्या साहील डोर्ले हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराच्या वतीने प्रशस्तिपत्र तसेच रोख रक्कम प्रदान करण्यात आली. तसेच कै. नेत्रा नेमिनाथ मांगले व कै. दयानंद यशवंत मांगले यांच्या स्मरणार्थ श्री. प्रथमेश नेमिनाथ मांगले यांच्याकडून प्राप्त झालेली रोख रक्कमही गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराचे उपाध्यक्ष श्री. रवींद्र पोकळे, सचिव श्री. दीपराज बिजीतकर, सहसचिव श्री. राजाराम दंताळ, सदस्य श्री. नितीन जठार, श्रीमती पद्मा बोगार, सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. श्रीधर डोर्ले तसेच महिला मंडळाच्या सदस्या श्रीमती पद्मा दंताळ, श्रीमती पौर्णिमा मांगले, श्रीमती रश्मी नवाळे, श्रीमती रेखा पोकळे, श्रीमती शैलजा डोर्ले आदी उपस्थित होते.