कणकवली : नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा १०० टक्के कर्जवसुलीबद्दल गौरव

शेअर करा

कणकवली,दि.०६ ऑगस्ट

नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने बँक स्तरावर १०० टक्के कर्जवसुलीची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते सोसायटीचा सत्कार करण्यात आला.

सोसायटीचे चेअरमन गौरीशंकर खोत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ५ वर्षांत शेतकरी हिताच्या विविध योजना राबविण्यात आल्या असून, शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या सातत्यपूर्ण कामाचा परिणाम म्हणून सोसायटीने १०० टक्के कर्जवसुलीचा मान मिळवला आहे.

यावेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अतुल सदडेकर, संचालक शामसुंदर मोरये, अनिल चव्हाण, बाळा सातोसे, धर्माजी तांबे, सचिव अजय गोसावी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

एकेकाळी आर्थिक अडचणीत आलेली संस्था नांदगाव सोसायटी चेअरमन गौरीशंकर खोत यांच्या नेतृत्वाखाली तसेच संचालक मंडळ आणि सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज पुन्हा नावारूपाला आली आहे. या यशात शेतकरी सभासदांचेही मोठे योगदान असून, त्यांच्या सहकार्याबद्दल सोसायटी व्हाइस चेअरमन अतुल सदडेकर यानी आभार व्यक्त केले.

शेअर करा