कणकवली : प्राण जीवन सहयोग संस्थेची सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी – सुशील गोसावी

शेअर करा

शिरवल येथे प्राण जीवन सहयोग संस्थेकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कणकवली,दि.०४ सप्टेंबर
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा आणि गरजू मुलांना शिक्षणात मदत मिळावी, या उद्देशाने “प्राण जीवन सहयोग संस्था”, शिरवल’ विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रम राबवित आहे. संदीप चौकेकर या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य आणि शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच मदत करतात.त्यांची शाळेप्रती आत्मियता असुन त्यांचा दातृत्वाचा गुण आदर्शवत आहे.निश्चितच हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.स़ंस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा गुण सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांची सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक सुशिल गोसावी यांनी केले.

शिरवल शाळा नंबर १ येथे वह्या वाटप कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपसरपंच प्रवीण तांबे, माजी सरपंच तथा प्राणजीवन संस्थेचे सदस्य मनोज राणे,अनिप सावंत, तुळशीदास कुडतरकर आदी उपस्थित होते.

प्रवीण तांबे म्हणाले की, संदीप चौकेकर आणि प्राणजीवण सहयोग संस्थेचे शैक्षणिक कार्यात भरीव योगदान असुन जिल्ह्यातील अनेक शाळा मध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले होते.तसेच कणकवली तालुक्यातील अनेक शाळा मध्ये वहया वाटप करुन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.

यावेळी पहिले ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

शेअर करा