Kankvali : लोकशाही वाचवण्यासाठी देशाच्या गद्दारांनी राजीनामा द्यावा

शेअर करा

, कणकवलीत आज आंदोलन

कणकवली,दि.१३ ऑक्टोंबर

लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि देशहिताच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी कणकवली येथे आज मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राजीनामा दिलाच पाहिजे’ अशी ठाम भूमिका घेत भारतीय तिरंगी झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी देशाच्या गद्दारांनी राजीनामा द्यावा, असा संदेश या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

या आंदोलनाचे निमंत्रक विनायक (बाळू) मेस्त्री, डॉ. मिलिंद म्हस्कर आणि अॅड. मनोज सावंत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा