प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र आणि ग्रामीण कृषी मौसम सेवेकडून २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी हवामानाचा अंदाज जाहीर
सावंतवाडी,दि.२७ऑक्टोंबर
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या ५ दिवसांचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
या ५ दिवसांच्या कालावधीत २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानाचा सविस्तर अंदाज (२८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६):
२८ ऑक्टोबर (दिवस १): हवामान कोरडे राहील (पाऊस ० मि.मी.). कमाल तापमान ३५° से. तर किमान तापमान २२° से. राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ८ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहण्याची शक्यता आहे.
२९ ऑक्टोबर (दिवस २): ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३४° से. तर किमान तापमान २५° से. राहील.
३० ऑक्टोबर (दिवस ३): ५ मि.मी. पावसाचा अंदाज आहे. कमाल तापमान ३३° से. तर किमान तापमान २६° से. राहू शकते. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडे राहील.
३१ ऑक्टोबर (दिवस ४): २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३२° से. आणि किमान तापमान २५° से. राहील.
०१ नोव्हेंबर (दिवस ५): पाऊस पडण्याची शक्यता नाही (० मि.मी.). कमाल तापमान ३३° से. तर किमान तापमान २३° से. राहण्याचा अंदाज आहे.
या कालावधीत सकाळी हवेतील सापेक्ष आर्द्रता ५७% ते ७९% आणि दुपारी ५३% ते ७१% दरम्यान राहील. तसेच वाऱ्याचा वेग ताशी ५ ते ८ कि.मी. दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीकामांचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.