Sawantwadi News:चौकुळ येथील चिखलवळ-बेरडकीत समाजमंदिराचे भूमिपूजन उत्साहात

शेअर करा

आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून समाजमंदिराची उभारणी; भूमिपूजन सोहळ्याला बेरड समाजबांधवांची उपस्थिती

सावंतवाडी,दि.२७ऑक्टोंबर
चिखलवळ-बेरडकी, चौकुळ येथे आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून होणाऱ्या समाजमंदिराचा भूमिपूजन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्री. दिनेश शिवाजी गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बेरड समाजातील बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
​या कार्यक्रमास नंदू गावडे, भाऊ जाधव, बुधाजी नाईक, मोहन नाईक, नितीन गावडे (जॉन), सोमनाथ (सोमा) गावडे, अजित गावडे, युवराज नाईक तसेच बेरड समाजातील इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समाजमंदिराच्या माध्यमातून समाजातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे समाजातील ए, एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, समाजाच्या विकासासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी ही एक नवी सुरुवात ठरणार आहे, असे शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी म्हटले आहे.

शेअर करा