कणकवली : यंगस्टार कणकवली आयोजित भालचंद्र चषक २०२६ कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

शेअर करा

कणकवली ,दि.०८ ऑगस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन, कणकवली तालुका कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळ आयोजित भालचंद्र चषक २०२६ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विद्यामंदिरच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी नगरसेविका मेघा गांगण, नगरेसवक स्वप्नील राणे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, अमोल रासम, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, बंटी तहसीलदार, अक्षय चव्हाण, रूपेश वाळके, रूपेश परब, रुचिर ठाकूर, अभी चव्हाण, संदेश आर्डेकर, नंदू वाळके, भैया आळवे, रुदरेश लाडगावकर, किरण सावंत, दीपक देऊळकर, तुषार मोरे, उदय यादव, प्रियांका कोरगावकर, ओमकार हळदिवे, समीर कमलापुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू वालावलकर व हरेश सावंत यांनी केले. यावेळी कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा