कणकवली : कारचालकावरील हल्ल्याप्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

शेअर करा

कणकवली,दि.१९ सप्टेंबर

राजापूर येथून स्विफ्ट कारने तीन प्रवाशांना घेऊन गोवा येथे निघाले असता त्या प्रवाशांनी चाकूने कार चालकावर जीवघेणा हल्ला केला होता. महामार्गावर हुंबरट येथे रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी कणकवली पोलिसांच्या पथकाने नाशिक येथून हल्लेखोरांना तांत्रिक माहितीच्या आधारे शिताफीने ताब्यात घेतले. नाशिकहून गुरुवार १७ सप्टेंबरला रात्री पोलिसांनी तिघांना कणकवली पोलीस ठाण्यात आणले. शुक्रवारी येथील न्यायालयात तिघांना पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने तिघांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरव शिवाजी कासव (वय २४), गिरीश देवाजी जमादार (वय २४), विकास ज्ञानेश्वर पठारे (वय २५ सर्व रा. अहिरखेडे, ता. चांदवड, जि. नाशिक) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित हल्लेखारांची नावे आहेत.
राजापूर येथून स्विफ्ट कारने तीन प्रवाशांना घेऊन गोवा येथे निघाले असता त्या प्रवाशांनी चाकूने कार चालकावर जीवघेणा हल्ला केला होता. कारचालकाने आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर प्रवासी पसार झाले होते. जखमी कारचालक रेहान इकबाल सय्यद (३२, रा. वाघुवाड़ा-राजापूर) यांच्यावर सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजापूर बस स्थानकवर गोवा येथे तीन प्रवासी थांबले असल्याची माहिती रविवारी रात्री ८ वा. च्या सुमारास रेहान सय्यद यांना त्यांचा चुलत भाऊ वसीम मालिन याने दिली होती. त्यानंतर रेहान याने त्या प्रवाशांची भेट घेत राजापूर ते गोवा असे ४००० रु. भाडे ठरविले व त्या तीन प्रवाशांना घेऊन रेहान हे स्वीप्ट कारने गोवा येथे जाण्यासाठी निघाले होते. रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास कार हुंबरट थांबविण्यास सांगितली. कार थांबविल्यानंतर काहीवेळात त्यातील एकाने गाडीच्या चावीची मागणी सीटवर बसलेल्या दुसºयाने रेहान याचा गळा दाबून धरला तर तिसºयाने चाकू रेहान यांच्या छातीवर सरकल्याने वार चुकला. त्यानंतर आपण कार मधून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेहान सरकल्याने वार चुकला होता. त्या प्रवाशांनी रेहान यांच्या दोन्ही पायांवर चाकूने वार करीत जखमी केले होते. या प्रकरणी पोलिसांनी कार ताब्यात घेतली होती. या गुन्हयाच्या तपासाची चक्रे गतिमान करीत पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, सुनील निकम, हनुमंत निकम यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तिघांना नाशिक येथून ताब्यात घेतले.

शेअर करा