कणकवली ,दि.०४ जुन
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महाविगकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी मागे घेण्यामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्वाची भूमिकिा बजावली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवत बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे.या संपूर्ण घडामोडीत पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांचा सत्कार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केला.
कणकवली येथील नीलम कंट्रीसाईड येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत आणि आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुभाष सावंत,प्रांतिक सदस्य विलास गावकर,कणकवली शहराध्यक्ष इम्रान शेख,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.