नगराध्यक्ष संदेश पारकर स्वत: उपस्थित राहत राबवली यंत्रणा ; आशिये रोडवर एकाच दिवशी कोसळले वटवृक्ष
कणकवली,दि.०५ जुलै
कणकवली शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आशिये रोडवरील मारुती मंदिर येथे असलेला जुनाट वटवृक्ष मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या कोसळला. त्यामुळे आशिये ला जोडणारा मुख्य रस्ता पुर्णत: बंद होत एका जुन्या घराची पडझड झाली. तसेच वीजवाहिन्यांवर हा व टवृक्ष पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत यंत्रणा राबवत पहाटे 4 वाजेपर्यंत अवाढव्य असलेला वटवृक्ष बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव, चिंटू नार्वेकर, अमोल पराष्टेकर, जीवन माणगावकर तसेच इतर कार्यकर्त्यांनीही सहभाग घेत ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य केले. मध्यरात्रीच्या वेळी घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सर्वांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
दरम्यान , शनिवारी सायंकाळी आशिये रोडवरील सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास आणखी एका वटवृक्षाची फांदी कोसळली होती. त्यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत वटवृक्षाची झाडी बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, या वटवृक्षामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र,धुवांधार पावसामुळे कणकवली शहरात मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, महावितरण कनिष्ठ अभियंता श्री. स्वामी, पोलीस हवालदार सुभाष शिवगण, रवींद्र महाडेश्वर, मनोज तोरसकर, नगरपंचायतीचे कर्मचारी सत्यवान कासले, संदीप उंबळकर, पदाधिकारी सुजित जाधव तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.