कणकवलीत ४ ऑक्टोबरला भाजपच्यावतीने ‘रांगोळी स्पर्धे’चे आयोजन

शेअर करा

शालेय व खुल्या गटातील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह

कणकवली,दि.३० सप्टेंबर

कणकवली भाजपा शहर मंडळाच्या वतीने ‘विकसित भारत सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली येथील भालचंद्र महाराज मठ येथे होणार आहे.

स्पर्धेत शालेय गट आणि खुला गट अशा दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

खुल्या गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी सुप्रिया नलावडे – 9422070340,आर्या राणे – 9763030152,मनस्वी ठाणेकर – 7057532007 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली शहर भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.

शेअर करा