कणकवली : रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीचा २६ ऑगस्टला स्थापना सोहळा

शेअर करा

कणकवली,दि.२५ ऑगस्ट

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या प्रायोजकत्वाखाली रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीचा चार्टर क्लब स्थापना सोहळा बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता भगवती हॉल, मराठा मंडळ रोड, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात रोटरॅक्टर आकांक्षा संतोष कांबळे यांची रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच रोटरॅक्टर राज समीर नलावडे यांची सचिवपदी, तर रोटरॅक्टर अॅड. दीपिका भेराराम राठोड यांची खजिनदारपदी नियुक्ती होणार आहे. रोटरी वर्ष २०२६-२७ साठीच्या संपूर्ण संचालक मंडळाचाही यावेळी पदभार स्वीकारण्याचा सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा सचिव प्रणय तेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर अमेय वरेकर हे स्थापना अधिकारी म्हणून पदभार सोहळा पार पाडणार आहेत. निखिल चिंदक अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच निकिता आराबेकर, झोनल रोटरॅक्ट प्रतिनिधी यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

‘UNITE – One Team, One Vision, One Impact’ या संकल्पनेतून रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, युवा नेतृत्व आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या चार्टर स्थापना सोहळ्यास नागरिक, रोटरी व रोटरॅक्ट सदस्य तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमास भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

शेअर करा