कणकवली स्थानकात सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वेचे उत्साहात स्वागत

शेअर करा

कणकवली,दि.०९ सप्टेंबर

कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग शाखा कणकवली यांच्या वतीने आज कणकवली रेल्वे स्थानकात सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळी १२ वाजता ही रेल्वे कणकवली स्थानकात दाखल झाल्यानंतर रेल्वे प्रवासी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रवाशांनी स्वागत केले.

यावेळी रेल्वे समन्वय समिती कणकवलीचे कार्याध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे, कणकवली रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष सावंत, नगरसेवक लूकेश कांबळे, समाजसेवक संजय मालंडकर, तसेच सुमित राणे, निलेश मोरे, रामदास ठाकूर, दीपक माडगूत, बंटी सावंत, आनंद कदम, निलेश सावंत आणि उमेश वाळके यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते.

सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वेला कणकवली स्थानकात थांबा मिळाल्याने कणकवलीसह मालवण, देवगड, विजयदुर्ग आणि परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या रेल्वे थांब्यामुळे मुंबई तसेच कोकणातील विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सोयीची रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे.

कणकवली स्थानकात या रेल्वेला थांबा मिळणे ही प्रवाशांच्या सातत्यपूर्ण मागणीला मिळालेली सकारात्मक दखल असून, यामुळे परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा