कणकवली तहसिलदार कार्यालय ते कॉलेज रोडवर धोकादायक खड्डा…

शेअर करा

नगरपंचायतने खड्डा बुजवण्याची नागरिकांची मागणी ; पाण्याचा अंदाज न आल्याने होताहेत अपघात

कणकवली,दि.०३ ऑगस्ट
कणकवली शहरातील तहसिलदार कार्यालय ते कणकवली कॉलेजकडे जाणा-या रस्त्यावर जुन्या गॅस एजन्सी इमारतीनजीक रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्याठिकाणी रस्त्यावर पाण्याचा विसर्ग होण्यासाठी नाला असल्याने सिंमेंटचे पाईप टाकण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी हा खड्डा पडलेला आहे. सध्या पाऊस असल्यामुळे या खड्ड्यांत पाणी साठत असल्याने वारंवार अपघात होत आहेत. या खड्डयाची डागडूजी कणकवली नगरपंचायतने तातडीने करावी , अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

शेअर करा