महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणी
कणकवली,दि.०३ ऑगस्ट
शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुने भाजी मार्केट लगत महसूल विभागाची जागा आहे. ती जागा भाजी मार्केटमध्ये वर्ग करावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी नलावडे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, निखिल आचरेकर, राजा पाटकर आदी उपस्थित होते.
महसूल विभागाची जागा मिळाली तर कणकवली भाजी मार्केट सुसज्ज होईल. याबाबतचा पत्रव्यवहार कोकण आयुक्त व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना करण्यात आला आहे. तरी आपण आपल्या अधिकारात त्या जागेबाबत लवकरात लवकर यो निर्णय घेऊन ती जागा नगरपंचायतीला वर्ग करावी, अशी विनंती मंत्री बावनकुळे यांना श्री. नलावडे यांनी केली आहे.