कणकवली,दि.१७ सप्टेंबर
केंद्र व राज्य सरकारने कोकणात केलेल्या विकास गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांना दिसला. यंदाही चाकरमान्यांसह सिंधुदुर्गवासीयांना गणेशमूर्ती खड्डयांतून आणावी लागली. हे सिंधुदुर्ग जिल्ह््यातील लोकप्रतिनिधी अपयश आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. पालकमंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवापूर्वी रो-रो जलवाहतूक व विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी कोकणात येणाºया चाकरमान्यांसाठी एसटी व रेल्वेची सोयी केली. मात्र, या सेवेचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने चाकरमान्यांचे प्रवास हाल झाले. मुंबईतून गाव गाठण्यासाठी १२ ते १८ तासांचा प्रवास चाकरमान्यांना करावा लागला. चाकरमान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या एसटीच्या बसेस व रेल्वे गाडयांची अवस्था दयनीय होती, या गाडयांमधून प्रवास हाल झालेल्यांनी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांचा संताप अनावर होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम १८ वर्ष झाली तरी पूर्ण न झाले नाही. त्यातच महामार्गावर खड्डे पडल्याने चाकरमान्यांना खड्डयांतून प्रवास करावा लागला. हे कोकणातील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे, असा आरोप उपरकर यांनी केला.
गणेशोत्सवापूर्वी पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह््यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार खड्डे बुजविण्यासाठी डांबराऐवजी जांभ्या दगडाचा वापर करण्यात आला. परिणामी बहुतांशी रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून चाकरमान्यांसह नागरिकांना गणेशदर्शनासाठी खड्डयांतून प्रवास करावा लागत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह््यातील आरोग्य सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह््यातील लोकप्रतिनिधी मंत्रालयात बैठक घेतात. मात्र, आरोग्य यंत्रणा अद्यापही सक्षम झालेली नाही. परिणामी जिल्ह््यातील शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना गोव्यात रेफर करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह््यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे, त्याला लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभूत आहे, अशी टीका उपरकर यांनी केली. पालकमंत्री यांनी रो-रो जलवाहतूक सुरू केली. मात्र, ही सेवा काही दिवसांनी बंद पडली. ही सेवा सुरू राहण्यासाठी ३ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात आले. या सेवेचा सर्वाधिक फायदा सेवा देणाºया कंपनीला झाला. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गात प्रवासी जलसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवेचा फायदा सर्वसामान्यांऐवजी मुंबईतील सेवा देणाºया कंपनीला फायदा करून देण्याचा डाव आहे, असा आरोप उपरकर यांनी केला.