कणकवली,दि.०५ जुलै
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरविकास आघाडीच्या वतीने कणकवली शहर मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन व व्यवस्थापन शितल रामदास मांजरेकर यांनी केले असून, ही स्पर्धा रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत विद्यामंदिर प्रशाला, कणकवली येथे होणार आहे.
स्पर्धा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली असून, पहिला गट इयत्ता पहिली ते दुसरी, दुसरा गट तिसरी ते चौथी, तिसरा गट पाचवी ते सातवी आणि चौथा गट आठवी ते दहावी अशा स्वरूपात विभागण्यात आला आहे.
प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे शितल रामदास मांजरेकर यांच्याकडे ८६००२९२९०४ वर नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.