कणकवली,दि.२८ सप्टेंबर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपुरी आश्रम व अनुभव शिक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ४ आॅक्टोबरला सकाळी १० वा. गोपुरी आश्रम येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी गांधीजींच्या पुस्तकांतून उलगडणारे जीवन, विचार आणि कार्य, जेन-झीच्या नजरेतील गांधींजी, सद्यस्थितीतील आंदोलनांमगील गाधींच्या अहिंसवादी सत्याग्रहांची प्रेरणा हे विषय आहेत. या स्पर्धेतकरिता अनुक्रमे पुस्तके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.