कणकवली : माजी खा. विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश ; ठाकरे शिवसेनेला बसला धक्का

कणकवली,दि.२१ ऑगस्ट

ठाकरे शिवसेना सचिव,माजी खा.विनायक राऊत यांचे निकटवर्तीय कणकवली विधानसभा समन्वयक सचिन सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.त्यामुळे कणकवलीत ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे.त्यांच्या समवेत कणकवली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले.

कणकवली- देवगड माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत, कसवन माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, सतीश सापळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद गांवकर, विलास सावंत, सखाराम घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, सुरेश गुरव, वैभव शेटये, सत्यवान मेस्त्री, अजित मेस्त्री, हळवल माजी उपसरपंच विष्णू ठाकूर ,दिलीप ठाकूर, राज सावंत ,मंगेश राजाध्यक्ष, उमेश मेस्त्री आदी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि.प.सदस्य संदीप गावडे, माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत, सभापती हर्षदा वाळके,उपसभापती सोनू सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,वागदे सरपंच संदीप सावंत, सरपंच मिलिंद सर्पे, उपसरपंच भाई सावंत, चेअरमन प्रशांत सावंत, माजी सरपंच अशोक सर्पे, बंड्या मालंडकर, ग्रामस्थ अभय गावकर, महेंद्र गावकर, गणपत मेस्त्री, उमेश गुरव, प्रमोद तेली, मॅक्सी फर्नांडिस, एकनाथ सावंत, लवू दळवी, संतोष सावंत, मनोहर नाधावडेकर, संतान फर्नांडिस, मंगेश गुरव, कृषी सेवा प्रतिनिधी दिनेश मेस्त्री, तुषार सर्पे, महेंद्र गुरव, प्रशांत तळवडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो … भारत माता की जय … वंदे मातरम् अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

शेअर करा