अडचणी च्या वेळी खत उपलब्ध करून दिल्याबद्दल भिरवंडे गांधीनगर गावातील शेतकऱ्यांनी मानले आभार
कणकवली,दि. २१ जून
या वर्षी शेतकऱ्यांना खत मिळणे मुश्किल झाले आहे शेतकऱ्यांना शेती पीक धोक्यात आले आहे असे वाटत असतानाच योग्य वेळी युरिया खत उपलब्ध करून दिलात त्यामुळे आम्ही शेतकरी तुमचे ऋणी आहोत अशी भावना भिरवंडे व गांधीनगर गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली, युवा संदेश प्रतिष्टान च्या वतीने आणि माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या सौजण्याने दोन्ही गावातील शेतकऱ्यांना प्रत्येकी पंधरा किलो मोफत खत वाटप करण्यात आले यावेळी सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, श्रीकांत सावंत, जेष्ठ ग्रामस्थ सुरेशचंद्र सावंत,अनिल सावंत, विनय सावंत स्यांडू सावंत, सुनील सावंत,संजय उर्फ छोटू कदम, प्रकाश सावंत आणि शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते माजी अध्यक्ष गोटया सावंत यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण कायम राहणार असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांनी शेतात आधुनिक यंत्र वापरून विविध प्रयोग करून उत्पादन क्षमता वाढवावी असे आवाहन ही केले