सभापती हर्षदा वाळके,उपसभापती सोनू सावंत सर्वांनी उपस्थित राहण्याचे केलं आवाहन ; एकाच छताखाली मिळणार कोकणी मेवा,गावठी भाज्यासह विविध पदार्थ..
कणकवली,दि.१५ जून
कणकवली पंचायत समिती आणि स्नेहसिंधु पदवीधर संघाच्या वतीने शहरात स्थानिक शेतकरी, महिला बचत गट व ग्रामीण भागातील उत्पादकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ थोड्याच वेळात राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कणकवली पंचायत समिती परिसरात या गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ होणार आहे.या आठवडा बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला, गावठी उत्पादने, घरगुती पदार्थ, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शुभारंभ कार्यक्रमासाठी कणकवली शहरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण संस्कृती, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन गावठी आठवडा बाजार या संकल्पनेतून मिळणार आहे. तरी या शुभारंभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सभापती हर्षदा वाळके,उपसभापती सोनू सावंत यांनी केले आहे.