कणकवली,दि.२५ जून
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार, २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यात नियोजित असलेल्या विविध शासकीय व सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे हे कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी नागरिकांच्या गाठीभेटी घेणार असून, स्थानिकांच्या समस्या व विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होण्यासह नागरिकांना थेट संवादाची संधी उपलब्ध होणार आहे.