कणकवली,दि.२२ ऑगस्ट
कोळोशी मधलीवाडी येथील दिनकर तुकाराम इंदप (७५) यांचे शनिवारी सकाळी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.ते कोळोशी माजी सरपंच तथा भाजप नांदगाव शक्ती केंद्र प्रमुख सुशील इंदप यांचे वडील होत.तर माध्यमिक शिक्षण शाळा
कोळोशी- हडपिडचे ते निवृत्त शिक्षकेतर कर्मचारी होते.गावातील सर्व धार्मिक , सांस्कृतिक कार्यामध्ये दिनकर इंदप यांचा मोठा सहभाग असायचा.तर एक प्रामाणिक व शांत संयमी व्यक्तीमत्व अशी त्यांची परिसरात ओळख होती.त्यांच्या निधनाची वृत्त समजताच परिसरातून हळहळ
व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.