पंचायत समिती सदस्य अण्णा खाडये यांनी महामार्ग प्राधिकरणला कळवले ; तातडीने उपाययोजना करण्याची केली मागणी
कणकवली ,दि. १० जून
मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे ओव्हर ब्रिजचा स्लॅब कोसळल्यानंतर त्या ठिकाणी मलमपट्टी करण्यात आली होती.मात्र मान्सून पावसाच्या सुरवातीलाच त्या पुढच्या स्लॅबमधून पाणी खाली पडत असल्याने कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्राजच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहे.याबाबत पं.स.सदस्य सहदेव उर्फ अण्णा खाडये यानी राष्ट्रीय महामार्ग विभागासह फोन व्दारे कळवत या विषयी माहिती दिली असून ऐन पावसाच्या तोंडावर ओव्हर ब्रीजला गळती लागल्याने पूलाचा स्लॅब कोसळण्याची भिती व्यक्त केली जात असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
कासार्डे ओव्हर ब्रीजचा स्लॅब दि.८ मे रोजी पडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक कासार्डे सर्व्हीस रोडवर वळविण्यात आली होती. यानंतर स्लॅब पडलेला भागासह काही भाग काढून टाकत दि.१० मे रोजी त्यावर डागडुजी करून स्लॅब पूर्ण करण्यात यात त्याची देखभाल करून सदरचा भाग सोडून त्या पुलावरील एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली होती.त्यानतंर बुधवार सकाळी तब्बल 20दिवसांनी सदर ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ठेकेदारांकडून त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले.
यानंतर कासार्डे ओव्हर ब्रीजवरून तीनही लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र सध्या मान्सून पाऊस म्हणावा तसा सक्रिय झालेला नसला तरी रविवारी पाऊस सुरू झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी लागलेल्या पाऊसात या ब्रिजवरून पाणी पडण्यास सुरुवात झाली. यामुळेच स्थानिकांसह पं.स.सदस्य सहदेव खाडये,चेतन शेटये यानी याची पाहणी श्री.खाडये यानी कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, खारेपाटण उपविभाग सहा. अभियंता देवीदास कुमावत याना संपर्क केला.
यानंतर ठेकेदार कंपनीकडून कर्मचारी दाखल होत या भागाची पाहणी करून श्री. खाडये,माजी तंटामुक्त अध्यक्ष श्रीरंग पाताडे यानी त्याना माहिती देत महामार्ग त्या ठिकाणी बंद करा अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत ब्रीजवर जाऊन पाहणी करण्यास सांगितले. यानंतर त्यानी पाहणी करून याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरीष्ठ कार्यालय दिल्ली येथून येत पाहणी करून गेले असून याबाबत ताताडीने उपाययोजना केली जाईल असे सांगितले. मात्र मुसळधार पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्लॅबला गळती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सध्या केलेली मलमपट्टी किती दिवस टिकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीने पावसाळा असल्याने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.