कणकवली,दि.१२ जुलै
कणकवली तालुक्यातील वरवडे , पिसेकामते, आशिये, कलमठ, सातरल – कासरल आदी गावांमधील वीज पुरवठ्याशी संबंधित समस्यांवर चर्चा करुन समस्या सोडवण्यासाठी १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता महावितरणच्या कणकवली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात बैठक होणार आहे. या गावातील वीज वितरणशी संबंधित असणा-या ग्राहकांनी उपस्थित रहावे. या बैठकीची मागणी महावितरणकडे उपसभापती राजेश सावंत यांनी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून विविध गावांमध्ये वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा तसेच अन्य तांत्रिक अडचणींबाबत नागरिकांकडून तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्व समस्यांवर चर्चा होऊन तोडगा काढण्यात येणार आहे. तसेच वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.