कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट ; दुर्गा मातेसमोर केली महाआरती
कणकवली,दि.१६ ऑक्टोंबर
भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सवाला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी ना. नितेश राणे यांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले व महाआरती केली.आई दुर्गामाते महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट दूर कर..असे साकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी घातले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,दिलीप तळेकर,बँक संचालक विठ्ठल देसाई,खरेदी विक्री संघ चेअरमन प्रकाश सावंत, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण ,आर्या राणे,प्रतिक्षा सावंत, सुप्रिया नलावडे, मनस्वी ठाणेकर,स्वप्नील राणे,महेश सावंत,सागर राणे,रामू विखाळे,स्वप्नील चिंदरकर, पप्पू पुजारे, संदीप सावंत,महेश सावंत,अजय गांगण , मिथुन ठाणेकर,समर्थ कोरगावकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.