राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजाला सुखसमृद्धी लाभावी यासाठी गणरायाला साकडे
कणकवली,दि.२८ सप्टेंबर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवलीच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्यात सुख-समृद्धी नांदावी,शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण व्हावे,यासाठी त्यांनी श्री गणरायाच्या चरणी साकडे घातले.
कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने दरवर्षी कणकवलीच्या राजाच्या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे कणकवलीच्या राजाशी गेल्या वीस वर्षांपासून अतूट भक्तिभावाचे नाते आहे.गेली दोन दशके ते “कणकवलीच्या राजाची” मनोभावे सेवा करीत असून,दरवर्षी या गणेशोत्सवात त्यांचा सहभाग असतो.धार्मिक श्रद्धेसोबतच सर्वधर्मसमभावाची भावना जपणारे त्यांचे हे कार्य सामाजिक सलोख्याचा संदेश देणारे आहे.
कणकवली तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यथोचित सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुभाष सावंत, शहराध्यक्ष इम्रान शेख, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडूलकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष सावंत, निवेदक बाळू वालावलकर, चंद्रकांत सावंत, मनोज वारे यांच्यासह ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.