आशिष प्रकाश वालावलकर बेपत्ता झाल्याची भावाची पोलिसांत खबर; कणकवली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
कणकवली,दि.२३ ऑक्टोंबर
कणकवली शहरातील तेलीआळी येथील आशिष प्रकाश वालावलकर (वय ३३) हा युवक बेपत्ता झाला आहे. याबाबत आशिष याचा भाऊ सिद्धेश वालावलकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष हा २० आॅक्टोबरला आपण देवळात जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. त्या रात्री तो घरी परत आला नाही. त्यानंतर दोन दिवस नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो अद्यपाही सापडून आलेला नाही. त्यामुळे बेपत्ता झाल्याची खबर भावाने दिली आहे. उंची ५ फूट ४ इंच, रंग सावळा, अंगावर टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, पायात चप्पल, मोबाईल आहे, अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.