माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांची माहिती ; नगरोत्थान महाअभियानांतर्गत निधी
कणकवली,दि.०७ ऑक्टोंबर
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत उपलब्ध विकास निधीतून कणकवली शहरातील विविध विकासकामांसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रमोद जठार यांच्या शिफारशीनुसार ही कामे मंजूर झाली असल्याची माहिती माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिली.
कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये चिंतामणी अपार्टमेंट परिसरात १५ लाख रुपये खर्चाचे बंदिस्त गटार बांधण्यात येणार आहे. तसेच मसुरकर-किण्हई रोड परिसरात ५ लाख रुपये खर्चाचे हायमास्ट दिवे बसविण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या विकासकामांच्या मंजुरीचे पत्र जिल्हा नियोजन समितीकडून कणकवली नगरपंचायतीला प्राप्त झाले आहे. या कामांमुळे प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, बंदिस्त गटारामुळे पावसाळ्यातील पाण्याचा निचरा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. तर हायमास्टमुळे मसुरकर-किनई रोड परिसरातील रात्रीच्या प्रकाशव्यवस्थेत सुधारणा होणार आहे. या कामांसाठी कणकवली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी मागणी केली होती.