Kankavli News:साटेलकर बिल्डर्सचे मालक कैलास साटेलकर यांच्या मातोश्री सुरेखा साटेलकर यांचे निधन

शेअर करा

वयाच्या ६५ व्या वर्षी गोवा-बांबुळी येथे घेतला अखेरचा श्वास; तेर्सेबांबर्डे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

कणकवली ,दि.०१ नोव्हेंबर

कणकवली शहरातील साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे मालक कैलास साटेलकर यांच्या आई सुरेखा सुरेश साटेलकर ( वय 65, रा. तेर्सेबांबर्डे , साटेलकरवाडी ) यांचे गोवा बांबुळी येथे वैद्यकीय उपचारादरम्यान शनिवार 31 ऑक्टोबर रोजी दुपारी निधन झाले. श्रीमती सुरेखा यांच्यावर मागील काही दिवस रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तेर्सेबांबर्डे येथील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शेअर करा