Talere News:कॅरम स्पर्धेत कासार्डेच्या अभिषेक देवरुखकरचे घवघवीत यश

शेअर करा

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात ४५ खेळाडूंवर मात करत प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तळेरे,दि.०१ नोव्हेंबर

कणकवली तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे झाली. या स्पर्धेमध्ये कासार्डे विद्यालयाचा अभिषेक देवेंद्र देवरुखकर याने १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून अव्वल स्थान पटकावले आहे.त्याची जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अभिषेक देवरुखकर याने सहभागी तब्बल ४५ खेळाडूवर मात करून १४ वर्षांखालील मुलांच्या गटात खेळताना जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
या खेळाडूला प्रा. विनायक पाताडे, अवधुत कानकेकर व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे ,प्र.मुख्याध्यापक श्री.ए.पी.घुले , जेष्ठ शिक्षिका सौ.आर.आर.सरवणकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा