Sindhudurg News:दिल्लीतील ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीत सिंधुदुर्ग काँग्रेसचा सहभाग

शेअर करा

रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या महारॅलीत प्रिती बांदेकर-शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी

सिंधुदुर्ग ,दि.०१ नोव्हेंबर

नवी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिल्ली चलो, व्होट बचाओ, देश बचाओ’अभियानांतर्गत रविवारी महारॅली पार पडली. या रॅलीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या प्रिती बांदेकर-शर्मा यांच्यासह महाराष्टÑातील कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह््यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या महारॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार विश्वजीत कदम, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्यासह महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या महारॅलीतील सहभागानंतर प्रतिक्रिया देताना प्रिती बांदेकर-शर्मा म्हणाल्या, आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर पाहायला मिळालेला जनसागर हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण आहे. गेल्या जवळपास ३० वर्षांतील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक राजकीय रॅलीपैकी ही एक रॅली ठरली आहे. देशभरातून जवळपास १० ते १२ लाख नागरिकांनी या महारॅलीत सहभाग नोंदवून लोकशाही, संविधान आणि मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी आपली एकजूट दाखवून दिली.
या महारॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे एवढया प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती असूनही रॅली शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी दिलेला संदेश महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहिला पाहिजे, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असली पाहिजे .लोकशाही संस्थांचे संरक्षण झाले पाहिजे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र आणि कोकण विभागातील काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांमध्येही या अभियानाबद्दल प्रचंड उत्साह असल्याचे प्रिती बांदेकर शर्मा यांनी सांगितले.या ऐतिहासिक आंदोलनामुळे देशातील लोकशाही मूल्यांना अधिक बळ मिळेल आणि प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी देशभरात नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ही केवळ एक महारॅली नव्हती, तर भारतीय लोकशाहीवरील जनतेचा विश्वास, संविधानाप्रती असलेली निष्ठा आणि अन्यायाविरोधात एकजुटीने उभे राहण्याच्या निधार्राचे विराट दर्शन होते. रामलीला मैदानातून उठलेला आवाज देशाच्या कानाकोपºयांत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीने रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘चलो दिल्ली’ महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘व्होट बचाओ, देश बचाओ’चा नारा देत विरोधकांनी शक्तिप्रदर्शन केले.

शेअर करा