ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी रक्त तपासणीवर २५ टक्के सवलत; मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा पार पडला.
कणकवली,दि.०५ जुन
कणकवली येथील सनराईज टॉवर, महाडिक कंपाऊंड परिसरात नव्याने सुरू झालेल्या “निष्कर्ष क्लिनिकल लॅबोरेटरी” चा शुभारंभ जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी 25 टक्के सवलतीत रक्त तपासणी होणार असल्याचे संचालिका शोभा गोडवे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , जिल्हा उपाध्यक्ष व दर्पण गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊळ, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , संचालक योगेश गोडवे, संचालिका शोभा गोडवे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी लॅबोरेटरीच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आरोग्य क्षेत्रात ही संस्था महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी लॅबोरेटरीच्या संचालिका प्रा. शोभा गोडवे (पी.जी., डी.एम.एल.टी.) यांनी उपस्थितांचे आभार मानले.
“अचूक तपासणी, विश्वासार्ह रिपोर्ट” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या लॅबोरेटरीमध्ये रक्त तपासण्या (CBC, ESR, HB), लघवी तपासण्या, शुगर तपासणी (FBS, PPBS, HbA1c), थायरॉईड तपासणी (T3, T4, TSH), बायोकेमिस्ट्री चाचण्या (LFT, KFT, लिपिड प्रोफाइल) आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच जलद व अचूक रिपोर्ट, वाजवी दरातील तपासण्या, होम कलेक्शन सुविधा आणि ५० वर्षांवरील नागरिकांसाठी व पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी 25 टक्के विशेष सवलत अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत