कणकवली : नरडवे तांबटवाडीत उभी असलेली स्प्लेंडर प्लस दुचाकी आगीत खाक…

शेअर करा

93 हजार 500 रुपयांचे नुकसान; कणकवली पोलिसांत जळीतची नोंद

कणकवली,दि.१५ जुलै

तालुक्यातील नरडवे तांबटवाडी येथे उभी असलेल्या स्प्लेंडर प्लस मोटारसायकलीला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे 93 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले असून, कणकवली पोलीस ठाण्यात जळीत रजिस्टर क्रमांक 06/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी अमृत रामचंद्र घाडीगावकर (वय 39, रा. नरडवे तांबटवाडी, ता. कणकवली) यांनी पोलिसांकडे खबर दिली. त्यांच्या मालकीची स्प्लेंडर प्लस कंपनीची नवीन काळ्या रंगाची मोटारसायकल (क्रमांक MH-07 AV-7234) ही 13 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 14 जुलै रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान अचानक कशाने तरी आग लागून पूर्णपणे जळून गेली.
या जळीतप्रकरणी 14 जुलै रोजी दुपारी 12.22 वाजता कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वेंगुर्लेकर करीत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध पोलीस घेत असून तांत्रिक कारण की अन्य काही कारण याबाबत तपास सुरू आहे.

शेअर करा