कणकवली : सिंधुदुर्गात अनेक एसटी बस फे-या रद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप

शेअर करा

कोणतीही पूर्व कल्पना न देता बस फे-या रद्द ; बस फे-या रद्द झाल्याने प्रवाशांना दामदुप्पट पैसे मोजण्याची आली वेळ

कणकवली,दि.२१ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध एसटी बसस्थानकातून सुटणा-या एसटी बस गेल्या 2 दिवसांपासून रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर , पुणे यासह जिल्ह्यातील लोकल बस फे-या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रवाशांची होरपळ मोठ्या प्रमाणात होत आहे. एसटी फेरी नसल्याबाबत प्रवाशांना कोणतीही पूर्व कल्पना दिली जात नाही. बस फेरीची वेळी आली तरी ध्वनीक्षेपण त्याबाबत माहिती दिली जात नाही, त्यामुळे एसटी महामंडळाकडून सध्या प्रवाशांची ससेहोलपट सुरु आहे.बस फे-या रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक एसटी बस फे-या रद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली , कुडाळ , सावंतवाडी , देवगड , मालवण , वेंगुर्ले यासह सर्वच जिल्ह्यातील बस स्थानकातील बस फे-या रद्द करण्यात आलेल्या आहेत. रविवारी परतीच्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार 110 बसेस मुंबईकडे सोडण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील बस फेरी सेवेचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घेवुन दामदुपप्पट पैसे देवून जाण्याची वेळ आली आहे. अजुनही या बसेस जिल्ह्यात परतल्या नाहीत. सोमवारी पुन्हा चाकरमान्यांना घेवून 48 बसेस चाकरमान्यांना घेवून सोडण्यात येत आहेत. तर मंगळवारी 10 बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लोकल फे-या एसटीच्या ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


लोकल फे-या बंद झाल्याने प्रवाशांना मनस्ताप-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच आगारांमधुन बस फे-या रद्द करुन मुंबईसाठी जिल्ह्यातील बसेस सोडण्यात आल्या आहेत. मात्र, याबाबत पूर्व नियोजन किंवा बसफे-या रद्द होणार असल्याची जनजागृती एसटी महामंडळाकडून करण्यात आली नाही, परिणामी सर्वसामान्य गोरगरीब एसटी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक बसफे-या अचानक रद्द झाल्यामुळे खाजगी वाहनांचा आधार घेवून प्रवाशांना घरी जाण्याची वेळ आली आली.अनेकांना तासनतास बस स्थानकात बसण्याची वेळ आली आहे. वयोवृध्द व आजारी प्रवाशांना या एसटीच्या विस्कळीत सेवेचा फटका गेल्या पंधरवड्यात अनेकदा बसला आहे.

शेअर करा