कणकवलीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण
कणकवली,दि.२८ जून
प्रवाशांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बसेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कणकवली एसटी आगाराला प्राप्त झालेल्या ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस गाड्यांचे मंत्री राणेंनी लोकार्पण करून गाड्यांची पाहणी केली. या नव्या राजमाता जिजाऊ बसेस अत्यंत आरामदायी असून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल. या बस गाड्यांमुळे तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगली आणि आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध होणार असून नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बससेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मंत्री राणेंनी केले. यावेळी एसटी अधिकाºयांशी संवाद साधताना प्रवाशांना दजेर्दार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, वाहतूक नियंत्रक दीपक घोडे, यंत्र अभियंता पांडुरंग वाघमारे, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, स्थानक प्रमुख श्रीनिवास कदम, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक संजय कामतेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.